भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून भाजपचा सरपंच निवडून आणण्यासाठी चक्क पन्नास लाख रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. वैभववाडी तालुका कार्यकर्ता आढावा बैठकीत बोलताना त्यांनी भाजपाची बिनविरोध ग्रामपंचायत येईल त्या गावाला ५० लाखाचा निधी देऊ अशी घोषणाच केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात बोलतानाचा हा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, हा व्हिडिओ वैभववाडीतील असल्याचं सांगितलं जातंय.
#NiteshRane #ElectionCommission #NarayanRane #Kokan #Sindhudurg #Dapoli #Ratnagiri #Offer #Sarpanch #Maharashtra #BJP #NileshRane